Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगावर काम सुरू झाले आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पगारात किती वाढ होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:21 IST2025-11-23T16:20:20+5:302025-11-23T16:21:23+5:30

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगावर काम सुरू झाले आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पगारात किती वाढ होईल.

8th Pay Commission Latest Fitment Factor May Range from 1.92 to 2.57; Check Your New Basic Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

8th Pay Commission :सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या ८वा वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे. सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. कारण, फिटमेंट फॅक्टर नावाचा हा घटकच त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल, हे ठरवणार आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणांक असतो, ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांच्या जुना बेसिक पगार नवीन पगारात रूपांतरित केला जातो. या आयोगाच्या वेळी हा फॅक्टर २.५७ निश्चित करण्यात आला होता. याचा अर्थ, कर्मचाऱ्याचा जुना बेसिक पगार २.५७ ने गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला गेला होता. आता ८व्या वेतन आयोगात हा फॅक्टर काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना महागाई, राहणीमानाचा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा यांचा विचार केला जातो. यामध्ये डॉ. वॉलस आर. एक्रोय्ड यांच्या फॉर्म्युल्याचाही समावेश असतो.

किती वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर?
वित्तीय फर्म अॅम्बिट कॅपिटलच्या अहवालानुसार, ८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सध्याचे किमान बेसिक वेतन १८,००० असेल, तर या फॅक्टरनुसार ते कसे वाढेल.

फिटमेंट फॅक्टर अपेक्षित नवीन बेसिक पगार वाढीची टक्केवारी (अंदाजे) 
१.८३ सुमारे ३२,९४० रुपये १४% 
२.४६ सुमारे ४४,२८० रुपये ५४% 

टीप: ५४% वाढ होण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यामुळे सरकारवर प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडेल.

नवीन ग्रेड पे नुसार संभाव्य पगार (अंदाजित)
८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.५७ दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. या आधारावर, वेगवेगळ्या ग्रेड पे नुसार नवीन पगारात मोठे बदल दिसू शकतात. खालील तक्त्यात अंदाजित नवीन पगार दर्शविला आहे, ज्यात बेसिक पगार, एचआरए, टीए, एनपीएस आणि सीजीएचएस यांचा समावेश आहे.

ग्रेड पेफिटमेंट फॅक्टरबेसिक (₹)नेट सॅलरी (₹)
१९०० १.९२ ५४,५२८ ६५,५१२ 
१९०० २.५७ ७२,९८८ ८६,५५६
२४०० १.९२ ७३,१५२ ८६,७४३ 
२४०० २.५७ ९७,९१७ १,१४,९७५ 
४६०० १.९२ १,१२,५१२ १,३१,२१३ 
४६०० २.५७ १,५०,६०२ १,७४,६३६ 
७६०० १.९२ १,५३,९८४ १,८२,०९२ 
७६०० २.५७ २,०६,११४ २,४१,५१९ 
८९०० १.९२ १,८५,४७२ २,१७,९८८ 
८९०० २.५७ २,४८,२६२ २,८९,५६९ 

फायदा कधी मिळणार?
न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील ८वा वेतन आयोग येत्या सुमारे १८ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. या अहवालात कर्मचाऱ्यांचे वेतन, बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर आणि इतर भत्त्यांसंबंधी शिफारसी असतील. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यावर हे बदल लागू होतील.

वाचा - ५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!

या बदलांमुळे देशातील सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
 

Web Title : सरकारी कर्मचारियों के वेतन में बड़ी वृद्धि: फिटमेंट फैक्टर समझाया गया।

Web Summary : सरकारी कर्मचारियों को 8वें वेतन आयोग के साथ वेतन में महत्वपूर्ण वृद्धि देखने को मिल सकती है। फिटमेंट फैक्टर, जो संभवतः 1.83 और 2.57 के बीच होगा, नए मूल वेतन का निर्धारण करेगा, जिससे इसमें काफी वृद्धि होने की संभावना है। आयोग की रिपोर्ट 18 महीनों में आने की उम्मीद है, जिससे लाखों कर्मचारियों और पेंशनभोगियों को लाभ होगा।

Web Title : Big salary increase for government employees: Fitment factor explained.

Web Summary : Government employees may see a significant salary hike with the 8th Pay Commission. The fitment factor, likely between 1.83 and 2.57, will determine the new basic salary, potentially increasing it substantially. The commission's report is expected in 18 months, benefiting millions of employees and pensioners.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.